Monday, 20 January 2014

सल्ला

सल्ला

तुम्ही कुणाला चांगलं सांगायला जा 
ते  तुमच्यावरच पलटतील 
तुम्ही समजवायला जा त्यांना 
ते घात घात करूँ ओरडतील 

तुम्ही मदत करा कुणाला 
ते तेवढ्याच वेळासाठी प्रेमात पडतील 
तुम्ही त्यांना प्रश्न विचारा 
ते मूर्तिमंत कृतघ्न दाखवातील 

तुम्ही कुणासाठी वेळ काढा 
ते हमखास उशीर करतील 
तुम्ही हे बोला चुकून त्यांना 
ते तुम्हाला हजार खोटी कारणं देतील 

कही शिकायाचेच असेल तुम्हाला 
तर दुसर्याचा विचार करायचा विसरा 
आणि दूरसे कोण हे ठरवण्याआधी 
आपले कोण हे नक्की ठरवा 

ह्या आपल्या लोकांसाठी तुम्ही काहीही करू नका 
ते तुमच्या बरोबरच राहतील 
कितीही भीषण काळोख असला 
तरी ते तुमच्या बरोबरच असतील 

ह्याच कारण एकच आहे 
तुमच्यातल अतूट प्रेम
ह्यांना जपा जीवापाड 
होईल सगळं कुशल क्षेम 

-अमित श्री  . खरे 

No comments:

Post a Comment