Monday, 20 January 2014

बहर

बहर 

मी बहरात असता 
बहरे सारे रान 
करते मग मज बेफाम 
ही ओढ़ कुण्या जन्माची 

बहरात डुम्बुनी काया 
येतसे ग्रीष्म नांदाया 
कुठे रुसून बसते छाया 
ही अल्लड वेळ नृत्याची 

नाचुनी हिंडती मोर 
करी गगनभेदी हिंडोर 
चातका लावी ही घोर 
जशी आस अशी वृष्टीची 

वृष्टीत कधी भिजताना 
भेभान होतसे राधा 
पाहुनी गर्द निळाई 
बहरात हरावुनी जाइ 

-अमित श्री  . खरे 

No comments:

Post a Comment