खेळणी आणि वाद्य
कुणीच खेलत नाहीत
ही अशीच पडूं आहेत धुळीत
दशकानू दशक
ही वाद्य ही आता
कुणीच वाजवत नाही
फाडक्यांमधे गुंडाळून
अडगळीत पडली आहेत
ह्या खेळण्यांची किम्मत
तेव्हा आम्हाला कोटींमधे होती
आता त्यावर तेवढ्याचीच
जलमत जमाली आहेत
वाद्यांचा उपयोग होतो कधी
जेव्हा ती देखावयासाठी नेतात
तिथे बघण्यासाठी त्यांना केवढी तरी गर्दी होते
घरात मलाही कधी वेळ होत नाही बघायचा
ती खेळणी आणि वाद्य
आज मुद्दाम काढली माळ्यावरून
थोड़ा आठवणीत रमुया
असा साधा विचार करून
उपयोगक काही झाला नाही
खुप पुढे निघून आलोय आता
कदाचित आता माझ्या आठवणींवर
तेवढीच धुल साचली असेल
ती ही साफ़ करायची गरज भासेल
पण ती काही केल्या साफ़ होत नाही
कारण आता वेळ नाही त्या आठवणीत जायला
कदाचित त्यासाठी परत मूल व्हाव लागेल
आणि त्याही आधी ते मूल मला शोधाव लागेल
ते इथेच लपले कुठेतरी
किंवा बदलले त्यानी रूप
पण आता शोधण गरजेचं आहे
कारण त्या आठवणीत परत जायचय
त्या खेळण्यांशी, वाद्यांशी नव्याने मैत्री करायला
कारण आता परत टी हरवली
तर उत्खनन करून शोधावी लागतील
काही शतकांनंतर
-अमित श्री . खरे
No comments:
Post a Comment