Saturday, 4 January 2014

मूर्ती

मूर्ती 


असीम प्रेमे तुझिया झालो 


कधी कानडा कधी वैरागी 

तुझिया नावे दानूनी सारे 

सहस्रकांचा निर्गुण त्यागी। 

तुझिया प्रेमे अर्पियले मी 

युगा युगांचे माझे मीपण 

स्वैर खुशीने अर्घीयले मी 

होते नव्हते माझे मन-धन। 

तुझिया पाशी घेवून आली 

ओढ़ मनाची दिशा दिशांतून 

तुझिया चरणी विरून गेली 

सुप्त वासना सुगंध होवून। 

तुझीच मूर्ती बनवीत असता 

कधी न दमलो अथवा थकलो 

बनवूनी मूर्ती अमूर्ततेची 

नंतर मजला शोधित बसलो।  


-अमित श्री  . खरे 

No comments:

Post a Comment