आनंद
प्रत्येक अंधार एक नवीन दिवस घेवुन येतो,
तरिहि आपण रोज तेच तेच काम करतो.
सकाळि उट्तो,
ओफ़िसला जातो,
कामचे धिग मांड्तो,
आणि उशिरा घरि येतो.
घरि येवुन फ़्रेश होतो,
टि.व्हि बघत जेवण करतो,
रत्रि थोडि कोफ़ि पीतो,
आणि परत रत्रि झोपून जातो,
सकाळि लवकर उथण्यासाटि.
नेहमि प्रमाणे सकाळि लवकर उट्तो,
परत परत तेच तेच करतो,
वर्शानु वर्श,
शतकानु शतकं.
कधितरि मनात टरवतो,
कहि वेगळं करु,
त्या दिवशि खटाटोप करतो,
आणि दुसर्या दिवशि गप्प पडतो,
त्याच फ़ाइल बघत.
सर्व प्रयत्न करुन होतात,
दिवस अन दिवस व्यर्थ जातात,
युगं सरल्या सारखी वर्श सरतात,
तेच तेच सुर्य फ़िरत रहातात.
कधितरि अचानक
रोज भेटणारा मित्र फ़ोन करतो,
संध्याकाळि कोफ़ि प्यायला
नक्यावरच्या टपरिवर बोलावतो,
आपण वेळेवर तिथे जातो
पण त्याला यायला उशीर होतो,
आपल्याला ओफ़िसचि सवय असते
मित्र घरिच बसुन असतो काम नसल्याने
गेलि अनेक दशकं.
त्याला काहि हजार मिळालेले असतात
एल.आय.सि.च्या पोलिसि मधुन,
त्यचिच हि पार्टि असते
टपरिवरच्या कोफ़ितून.
त्याला मिळालेलि रक्कम
आपल्या पगारा एवधि असते,
आणि त्याला मिळालेल्या आनंदाचि रक्कम
आपल्या सेविंग एवधि असते.
त्याचा आनंद बघुन आपण मात्र
खचित होतो,
कारण आजपर्यंत
फ़क्त आपणच आपले जगत असतो
घरात सगळे असताना.
आपल्याला हि बाब कळते,
आपण त्यातुन पटकन शिकतो
आणि लगचच्याच पगाराचि घरच्यांनाहि
पार्टि देतो त्या मित्रासकट,
त्याच नक्यावरच्या टपरिवर.
-अमित श्री . खरे
No comments:
Post a Comment