अहम
प्रत्येकजण आता इथे
जगतो फ़क्त स्वत:साठी
दुसर्याचा आता इथे
विचारसुधा होत नाही।
दुसर्यासाठी आश्रु सोडाच
पण आनंदही होत नाही
दुसर्याची साथ दूर राहिली
मदतीला हातही येत नाही।
केलेले वादे इथे
हर मिनिटात तुटतात
आणि शपथा तर इथे
वजनावर विकतात।
इथे आता कुणाला
कुणाचीच गरज नाही
गरजेला यन्त्रच सारी
माणूस तेव्हा दूरच राही।
आता इथे माणूस असणं
हेच आहे मोठं पाप
कारण इथे संचारतो
अहम चा विषारी साप.
हाच साप जेव्हा ह्यांना
राक्षस होवून खायील
माणूसच तेव्हा ह्यांचा
मदतीला येईल।
-अमित श्री . खरे
No comments:
Post a Comment