ह्याचं उत्तर तुम्हीच शोधा।
खरतर हे कोडं नाही
न सुटणार
किंवा नाही हां अवघड प्रश्न
दोन पाच मार्कांचा।
दिसायला हे कोडं असेल
गूढ़ अर्थ लपलेलं
किंवा आतापर्यंत
कुणालाच न सुचलेलं
प्रश्न ही असेल कदाचित
अखंड उत्तर असलेला
ज्याच उत्तर
कुणाकडेच नाही असा।
ह्याच्यात आहेत
अनेक भावना
अनेक वेदना
अनेक सुखं
अनेक दुःख
अनेक नाती
अनेक माणसं
अनेक आशा
अनेक निराशा।
ह्यात आहेत
अनेक अनुभव
काही भले
काही बुरे
हयात आहेत
अनेक इशारे
काही खोटे
काही खरे।
हयात तुम्ही कधी
आपणहून जात नाही
हयात तुम्ही अडकता
जन्मलया बरोबर
ह्यातून सुटका
एकदाच
जेव्हा होतो
देह नश्वर।
ह्याला घाबरून
जाउ नका
हे तुम्हाला
खाणार नाही
ह्याला सुट्ट
सोडू नाका
हे परत
येणार नाही।
कोडं म्हणत असाल ह्याला
तर सोडवायचा प्रयास करा
प्रश्नच वाटला कढ़ी तुम्हाला
उत्तराच्या मागे लागा।
सुटेल किंवा सुटणार नाही
उत्तर मिळेल किंवा मिळणार नाही
शोधायचा प्रयत्न समजा केला
जीवन नक्कीच कळून जाई।
-अमित श्री . खरे
No comments:
Post a Comment