Saturday, 4 January 2014

गाढ़ झोप

गाढ़ झोप 



किती ओरडणार घसे फोडून 
ते तर कधीचेच बहिरे झालेत 
कर्ण्याचा आवाज कितीही मोठा करा 
त्यांची झोपमोड सुधा होत नाही आता 

त्यांना कधीही गाढ़ झोप लागते 
सकाळी दुपारी अथवा रात्री 
कारण त्यांची बांधलेलं 
चिरेबंदी अजस्त्र कुंपण 

ह्या कुम्पणाला दोनच बाजूने दार आहेत 
त्या प्रत्येक दारावर 
दहा बारा रक्षक आहेत 
ते आता सवायिनं मालकालाही तपासतात 

ह्या दारातून तुम्हा आम्हाला 
पलीकडचन काहीच दिसत नाही 
तुमच आमच इथे सोडाच 
वाराही ह्याचं घुसत नाही 

ह्यांना तेव्हाच जाग येते 
जेव्हा आपल्या बोटांवर शाई लागते 
तेव्हा मात्र ह्यांना ऐकू येतं इतक 
तुम्ही न मागितलेलंही देतात हे तुम्हाला 

थाम्बा सावध व्हा जागे व्हा  
हे ऐकू येणं थोड्या काळच आहे 
शाई बोटावरून जाण्याआधी
घोरणं ह्यांच चालू होणारे 

ह्यावर उपाय एकच 
ह्यांना झोपू देवू नका 
आता हे परत झोपले 
टार पुन्हा कधीच उठणार नाहीत 

-अमित श्री  . खरे 

No comments:

Post a Comment