Monday, 3 February 2014

ते लालबत्तीचे बेट

ते लालबत्तीचे बेट


संस्कृतीची वाहे सरीता
शहराच्या मधुनी जेथ 
मधोमध वसुनी आहे 
ते लालबत्तीचे बेट 

ह्या छोट्या बेतावरती 
माड्यांची झाली दाटी 
रातीची होतसे गर्दी 
इथे शरीर वासनेसाठी 

दिवसातून फिरता येथे 
शुक शुकाट वसे कायमचा 
दिस मावळता मावळता 
सूळसुलात नराधमांचा 

प्रत्येक उम्बार्यावरती 
निर्विकार चहरे बसती 
बेत नव्हे लोकांचे 
ही मार्तांची हो वस्ती 

इथे रोज होतसे करार 
निर्जीव आशा देहांचा 
सम्भोग येथ रोजचा 
भावनेविना शरीरांचा 

कितीक फुले हो येथे 
मुरागाळूनी तुडविलेली 
कुठे दूरच्या शहरांतूनी 
रातीत कुणी पळवलेली 

दिसता वर्दी गर्दीत 
सटकुन सर्व मग जाती 
जशी जादूच्या छडीने
माणसेच  गायब होती 

ह्या बेटावरती पूर्वी 
म्हणे होते मोठे वाडे 
काळाच्या पडद्यामागे
इतिहास वस्तीचा दडे  

ह्या बेतावरती आता 
माणुसकी उरली नाही 
उघडीच शरीरे पड़ती 
इथे पैशांसाठी काही  

-अमित श्री  . खरे

No comments:

Post a Comment