लीला
मृत्यूची चाहूल
जन्मा आधी लागे
काय ही रे किमया
जन्मदात्या!
कोमेजुन जाई कळी
उमलनया आधी
काय ही रे रया
विश्वकर्म्या !
वाहूनिया पाणी जाई
थोड़े पिण्या आधी
काय ही रे चेष्टा
अन्नदात्या!
दुःख आधी येते
सुखाच्या ही आड़
काय ही उपेक्षा
प्रेमदात्या !
शेवट होवुनी
मातीत मिळवसी
काय ही रे लीला
जगत्रात्या !
Amit khare.
No comments:
Post a Comment