माणसाचा शोध
पुरे झाले
फूल पक्षी
आता माणसासाठी लिहू
थोड़े सुखाचे
थोड़े दुःखाचे
ज़रा माणसाकडे पाहू।
किती वर्ष उगवणार
तेच तेच सूर्य तारे ?
किती वेळा बदलणार
तेच ऋतु ६ बिचारे ?
किती वेळा चातकाला
पावसाची वाट बघत बसवणार?
किटी वेळा सुन्दर चाफयाला
गालामधे खुदकन हसवणार ?
त्याच त्याच नद्या
आता वाहून वाहून कोरड्या झाल्या
त्याच समुद्राला तिथेच मिळताना
जाणून बुजून विसरुन गेल्या।
माणूसच का आता
आपल्याला दिसत नाही?
दिसला जर तर फ़क्त प्रेमात
बाकी कुठेच मिळत नाही।
माणसांचे प्रश्न आता
इतके का क्षुल्लक झाले ?
माणसांच्या भावनांचे
गल्लोगल्ली फलक झाले ?
माणूस कसा हरवून गेला
डॉन ओळी मधल्या यमकात?
माणूस मागे पडत गेला
चालींच्या सुन्दर गमकात।
आता त्या पुन्हा एकदा
थोड़े थोड़े आठवायला हवे
पुन्ह्या कविता गाण्यातून
माणसाला शोधायला हवे।
-अमित श्री . खरे
No comments:
Post a Comment