चक्र
मन आभाळ आभाळ
मुक्त पाखरांचे घर
त्यात कधी येती जाती
ढग पावसाळी चार।
मन पावसात भीजे
चिंब ओले ओले होई
मग तृप्तित जळाच्या
नदी होवुनिया जाई।
मन वहाता वाहता
मागे वालोनी मग पाही
वाट डोंगर दरयांची
त्यास वाटेनाच काही।
मन तहाने व्याकुळे
सर्वां जीवन देवुनी
त्याचे त्यास ना उमजे
स्वत: नदी ही होवुनी।
चार कोस ओलांडोनि
मिळे सागरास कोठे
त्याचे तयात कळे ना
चक्र आयुष्याचे दीठे।
भूतकाळ आठवता
त्यास पड़ते हे कोड़े
मग तापोनि तापोनि
पुन्हा आभाळास भिड़े।
-अमित श्री . खरे
No comments:
Post a Comment