Saturday, 4 January 2014

रागरंग

रागरंग 



अचानक धावून येतोस 
वसन्तातल्या तानांतून 
अन क्षणात घेवून जातोस 
मारव्यापारी हलकेच दूर।  
देस प्रमाणे तुझ असण 
अगदी उपजत वाटतं 
बोलणं मात्र श्री प्रमाणे 
स्थितप्रद्न्याच बोलणं वाटतं।  
मालकंसी शब्दांतून कधी  
अगदी मधुर वाटतोस 
तर अचानक  कौसी च्या 
द्रुततला तराणा होतास।  
तुझ वहात जाण
जौनपुरी सारख मनोहारी भासत 
तुझं शांत असणं 
पुरियासारख सुसंगत असत।  
तुझ्या साध्या शबदातूनही 
भक्तिमय भैरवी ऐकू येते 
अन तुझ्या मिलनाच्या कथा 
सहज बागेश्री सांगून जाते।  
असाच कायम आमच्यात 
भैरवासारखा घुमत रहा 
भिन्न षड्ज होवून सुधा 
सगळ्यांकडे सामान पहा।  

-अमित श्री  . खरे  

No comments:

Post a Comment