Saturday, 4 January 2014

मौन

मौन 



मौनात केवढा बोलून गेलो 
सुखाचं दुखाच गेलेल्या प्रत्येक क्षणाचं 
अचानक होवून शांततेचा आवाज 
अन हरवून शब्दांची आस।  

एवढा गोंगाट झाला तेव्हा 
एक आवाजाही न होता 
केवढा प्रचंड मोठा निशाब्द 
आघात झालेला जेव्हा।  

तेव्हाच जागा झालो होतो 
अविश्रांत अथक गुंगीतून 
एकटाच तेव्हा फिरत होतो 
गर्दीच्या निर्मनुष्य वस्तीतून। 

हरवलेल काहीसा
अस्पष्ट दिसल्यावर 
थक्का झालो अचानक 
त्याच जागी पोचल्यावर।  

आनंद एवढा 
शब्दात बांधू न शकल्यावर 
उतरूं आलो अचानक 
सात स्वर्ग मौनावर।  

मौनात बोललेल ऐकायला 
सोबतीला एक कान होता 
पुढे पुढे चालताना 
आधाराला हाट होता।  

तोच कान पुन्हा एकदा 
दशकांनंतर अवचित भेटला 
निश्चिन्त होवून मी ही तेव्हा 
मौनाचाच आधार घेतला।  

-अमित श्री  . खरे 

No comments:

Post a Comment