Wednesday, 12 February 2014

घोड़ चूक

घोड़ चूक

मोठ्या मोठ्या दप्तरी डोंगराला 
छोटे छोटे मानवी पाय,
मोठ्या मोठ्या दप्तारान्मधे,
दडल तरी असत काय?
मोठ्या मोठ्या दप्तारांत 
पुस्तकांचे ढीग,
प्रत्येकाच्याच डोक्यावर,
न्यानाचे वीग.
मोठ्या मोठ्या शालान्मधे,
कड़क कड़क शिस्तीचे तास,
पिशवितल्या डब्यालाही येतो इथे,
माराचा असह्य वास.
मोठ्या मोठ्या खोल्यात
साठ साठ बेंच,
कुणालाच इथे लगत नाही,
मैदानावर ठेच.
प्रत्येक खोल्यांतुन येतो इथे,
घोकम पट्टीचा आवाज,
इथे शिकवायला आता,
एकही गुरु येत नाही आज.
इथे भरलेत
धीगानी शिक्षक,
आणि हेच बनाले आहेत
चिमुकल्यांचे भक्षक.
"आमच्यावेलाही असाच होंत",
सगलेच पालक म्हणतात,
मारून-मुटकून मुलांना,
ह्याच शालान्मधे टाकतात.
हेच चालू आहे पिढ्या अन पिढ्या
तरी काही शाळा सुधरत नाहीत,
मुलांचे बली देवूनही,
पालक शांत बसत नाहीत.
आता प्रत्येकाला कसे
चांगले मार्क मिलणार?
प्रत्येकजनच कसा
तेंडुलकर बनणार?
असाच चिरड़ता चिरड़ता,
एक जीव मोठा होतो,
परत तो तिथेच जावून,
तीच घोडचूक परत करतो,
मुलाला त्याच शालेत घालायची! 

-अमित श्री. खरे 

No comments:

Post a Comment