Tuesday, 4 February 2014

लपंडाव

लपंडाव 

लपंडाव हां तुझा नि माझा 
कोण लपे अन कोण शोधतो 
नकलत खेळून खेळ कधीचा 
डाव पुराणे नवे मांडतो 

तू शोधित असता मजला केव्हा 
तुझ्याच मागे मी ही घुमतो 
शोधू न शकता पाठशिविने 
दोघेही मग फिरुनी दमतों 

मी येतो जेव्हा शोधया तुज 
तू दडून कुठे लपतच नाहीस 
मी महत्प्रयत्ने शोधतो परी 
तू कधीच मजला गवसत नाहीस 

लपंडाव हां युग युगांचा 
तेव्हा पासून चालूच आहे 
जेव्हा टाहो फोडियाला मी 
 डावही तेव्हापासून वाहे 

-अमित श्री  . खरे

No comments:

Post a Comment