मी, मला मी , माझे...
मी, मला, माझे
माझ्यामुले, माझ्यासाठी,माझ्याशी
माझ्यापासून, माझ्यापर्यंत, माझ्यातून
उमटनारा फक्त मी.
आजूबाजूचे सगळे माझे
बघत जातो ते सर्वच राजे
माझ्यामाधाला मीही लाजे
माझ्यातूनाच फक्त गाजे.
माझ्याशीच माझा संवाद
माझ्याच मुले उमटे प्रतिसाद
माझ्यातूनाच येते उत्तर
माझ्यापाशी थाम्बे अंतर.
माझ्यातूनाच उगवे सारे
माझ्यामुलेच वाही वारे
माझ्यासाठी चमके तारे
माझ्यातीलच माझे गाणे.
मलाच माझे प्रश्न पड़ती
मलाच रस्ते कसे न मिलती
मलाच त्याम्तून मार्ग सापडे
माझ्याशीच तो येवून पोचे.
मला शेवटी हे न कले जे
माझ्याशीच का सर्व थांबते
मलाच तेव्हा हेही कलते
मी सोडूनही जग हे पलते.
असाच आहे मी ही निश्वर
असेच म्हणतो आदिम ईश्वर
असाच जेव्हा वाद हां जड़े
येवून मी ही माझ्याशीच अड़े.
-अमित श्री. खरे
No comments:
Post a Comment