Wednesday, 12 February 2014

अजब प्रेम

अजब प्रेम 

प्रेमापोटीच असेल बहुधा
पृथ्वी फिरते सूर्याभोवती
मायेनेच तिच्या त्या बहुधा
सूर्य चमकतो सदा आकाशी.

सूर्याचे नाते असे हे
प्रुथ्विने जे धरून ठेवले
अहंकार न करता कोणी
फिरत राहीले जळत राहीले.

रुसन्यासाथी असे कदाचित
दोघंसाठी कधी ग्रहण ते
बघता सुटल्या नंतर दोघा
कितिक येतसे गहिवरून ते.

अगणित वर्षे होवून गेली
सूर्य कधी ना शीतल होई
प्रेमाने ह्या परस्परांच्या 
पृथ्वी सुधा घिरट्या घेई.

-अमित श्री. खरे 

No comments:

Post a Comment