बघ ज़रा
रे मना घे भरारी
बघ ज़रा तूच मुरारी.
रे मना कर तयारी
बघ शक्ती तुझ्यात सारी.
रे मना उठ कधीतरी
बघ ज़रा थोड़े अंतरी
रे मना चढव वर्खरी
बघ जरा दिसे ती जरतारी.
रे मना सोड हुशारी
बघ ज़रा तू निर्विकारी
रे मना सांग विचारी
बघ ज़रा इत्छा विखारी.
रे मना तू जा शिवारी
बघ ज़रा धरणी बिचारी
रे मना ये किनारी
बघ निसर्गी किमया सारी.
रे मना तू बन शिकारी
बघ ज़रा तू व्यघ्रधारी
रे मना तू हो भिकारी
लाजेल तेव्हा तो गिरधारी.
- अमित श्री. खरे
No comments:
Post a Comment