Wednesday, 12 February 2014

मी, मला, माझे...

मी, मला मी , माझे...

मी, मला, माझे
माझ्यामुले, माझ्यासाठी,माझ्याशी
माझ्यापासून, माझ्यापर्यंत, माझ्यातून
उमटनारा फक्त मी.
आजूबाजूचे सगळे माझे
बघत जातो ते सर्वच राजे 
माझ्यामाधाला मीही लाजे
माझ्यातूनाच फक्त गाजे.
माझ्याशीच माझा संवाद
माझ्याच मुले उमटे प्रतिसाद
माझ्यातूनाच येते उत्तर
माझ्यापाशी थाम्बे अंतर.
माझ्यातूनाच उगवे सारे 
माझ्यामुलेच वाही वारे
माझ्यासाठी चमके तारे
माझ्यातीलच माझे गाणे.
मलाच माझे प्रश्न पड़ती
मलाच रस्ते कसे न मिलती
मलाच त्याम्तून मार्ग सापडे
माझ्याशीच तो येवून पोचे.
मला शेवटी हे न कले जे
माझ्याशीच का सर्व थांबते 
मलाच तेव्हा हेही कलते
मी सोडूनही जग हे पलते.
असाच आहे मी ही निश्वर
असेच म्हणतो आदिम ईश्वर
असाच जेव्हा वाद हां जड़े
येवून मी ही माझ्याशीच अड़े.

-अमित श्री. खरे

बघ ज़रा

बघ ज़रा

रे मना घे भरारी
बघ ज़रा तूच मुरारी.
रे मना कर तयारी
बघ शक्ती तुझ्यात सारी.
रे मना उठ कधीतरी
बघ ज़रा थोड़े अंतरी
रे मना चढव वर्खरी
बघ जरा दिसे ती जरतारी.
रे मना सोड हुशारी
बघ ज़रा तू निर्विकारी 
रे मना सांग विचारी
बघ ज़रा इत्छा विखारी.
रे मना तू जा शिवारी
बघ ज़रा धरणी बिचारी
रे मना ये किनारी
बघ निसर्गी किमया सारी.
रे मना तू बन शिकारी
बघ ज़रा तू व्यघ्रधारी
रे मना तू हो भिकारी
लाजेल तेव्हा तो गिरधारी.

- अमित श्री. खरे 

घोड़ चूक

घोड़ चूक

मोठ्या मोठ्या दप्तरी डोंगराला 
छोटे छोटे मानवी पाय,
मोठ्या मोठ्या दप्तारान्मधे,
दडल तरी असत काय?
मोठ्या मोठ्या दप्तारांत 
पुस्तकांचे ढीग,
प्रत्येकाच्याच डोक्यावर,
न्यानाचे वीग.
मोठ्या मोठ्या शालान्मधे,
कड़क कड़क शिस्तीचे तास,
पिशवितल्या डब्यालाही येतो इथे,
माराचा असह्य वास.
मोठ्या मोठ्या खोल्यात
साठ साठ बेंच,
कुणालाच इथे लगत नाही,
मैदानावर ठेच.
प्रत्येक खोल्यांतुन येतो इथे,
घोकम पट्टीचा आवाज,
इथे शिकवायला आता,
एकही गुरु येत नाही आज.
इथे भरलेत
धीगानी शिक्षक,
आणि हेच बनाले आहेत
चिमुकल्यांचे भक्षक.
"आमच्यावेलाही असाच होंत",
सगलेच पालक म्हणतात,
मारून-मुटकून मुलांना,
ह्याच शालान्मधे टाकतात.
हेच चालू आहे पिढ्या अन पिढ्या
तरी काही शाळा सुधरत नाहीत,
मुलांचे बली देवूनही,
पालक शांत बसत नाहीत.
आता प्रत्येकाला कसे
चांगले मार्क मिलणार?
प्रत्येकजनच कसा
तेंडुलकर बनणार?
असाच चिरड़ता चिरड़ता,
एक जीव मोठा होतो,
परत तो तिथेच जावून,
तीच घोडचूक परत करतो,
मुलाला त्याच शालेत घालायची! 

-अमित श्री. खरे 

दर्शन

दर्शन 

तुमचे फ़क्त असणे 
माझ्यासाठी पुरे नव्हे 
कधीतरी मधून दिसणे 
त्या असण्याचे मोल खरे 

असण्यामध्ये असतो नुसता 
भाव मनीचा सोबतीचा 
दिसण्यातूनच उमाळून येतो 
अर्थ खरा त्या बरोबरीचा 

शोधित असतो जो तो येथे 
असलेल्यांचे खरे चहरे 
दिसणार्यातून शोधाखेरीज
मिळती जिवलग ते असलेले 

जड़ती जेव्हा नाती मनांची 
तेव्हा असणे पुरे न पड़े हो 
न दिसणार्या , असलेल्या त्यांना 
काळ अचानक गायब करतो 

म्हणून असलेल्यांच्यापाशी 
दर्शनाचा हट्ट मी धरतो 
कधी आनंदे वा बलाने 
असेल्यांचे दर्शन करतो 

-अमित श्री  . खरे 

Tuesday, 4 February 2014

लपंडाव

लपंडाव 

लपंडाव हां तुझा नि माझा 
कोण लपे अन कोण शोधतो 
नकलत खेळून खेळ कधीचा 
डाव पुराणे नवे मांडतो 

तू शोधित असता मजला केव्हा 
तुझ्याच मागे मी ही घुमतो 
शोधू न शकता पाठशिविने 
दोघेही मग फिरुनी दमतों 

मी येतो जेव्हा शोधया तुज 
तू दडून कुठे लपतच नाहीस 
मी महत्प्रयत्ने शोधतो परी 
तू कधीच मजला गवसत नाहीस 

लपंडाव हां युग युगांचा 
तेव्हा पासून चालूच आहे 
जेव्हा टाहो फोडियाला मी 
 डावही तेव्हापासून वाहे 

-अमित श्री  . खरे

Monday, 3 February 2014

मनोगत

मनोगत 

असते समजा भय मृत्यूचे 
समरी कधी गेलोच नसतो 
घेवून हाती संगीन सखिसम 
शत्रुसंगे भिडालोच नसतो 

टाकला घर संसार मागे 
जाहलो सज्ज लढाया मी 
वरुन येता एक इशारा 
तुटून पडलो समरांगणी 

इशारा हां लढ़ावयाचा 
अभेद्य तटातूनी सहजच आला 
उंच डोंगरी चढ़ता चढ़ता 
सावरला ब्लेंछांचा घाला 

धारातीर्थी पडलो जेव्हा 
रक्ताच्या या डोहामध्ये 
अब्रही होते तेव्हा संगे 
जीव अडकला देहामध्ये 

डोळ्यात दाते पाणी त्याला 
अश्रू आता म्हणू नका 
उभारलेच स्मारक जरी 
नाव तयावर लिहू नका 

नाव असू द्या मनी तुमच्या 
प्रार्थनेत कधी मज स्मरा 
मुक्ति कदाचित मिळेल तेव्हा 
शांती लाभेल मणी ज़रा 

-अमित श्री  . खरे

ते लालबत्तीचे बेट

ते लालबत्तीचे बेट


संस्कृतीची वाहे सरीता
शहराच्या मधुनी जेथ 
मधोमध वसुनी आहे 
ते लालबत्तीचे बेट 

ह्या छोट्या बेतावरती 
माड्यांची झाली दाटी 
रातीची होतसे गर्दी 
इथे शरीर वासनेसाठी 

दिवसातून फिरता येथे 
शुक शुकाट वसे कायमचा 
दिस मावळता मावळता 
सूळसुलात नराधमांचा 

प्रत्येक उम्बार्यावरती 
निर्विकार चहरे बसती 
बेत नव्हे लोकांचे 
ही मार्तांची हो वस्ती 

इथे रोज होतसे करार 
निर्जीव आशा देहांचा 
सम्भोग येथ रोजचा 
भावनेविना शरीरांचा 

कितीक फुले हो येथे 
मुरागाळूनी तुडविलेली 
कुठे दूरच्या शहरांतूनी 
रातीत कुणी पळवलेली 

दिसता वर्दी गर्दीत 
सटकुन सर्व मग जाती 
जशी जादूच्या छडीने
माणसेच  गायब होती 

ह्या बेटावरती पूर्वी 
म्हणे होते मोठे वाडे 
काळाच्या पडद्यामागे
इतिहास वस्तीचा दडे  

ह्या बेतावरती आता 
माणुसकी उरली नाही 
उघडीच शरीरे पड़ती 
इथे पैशांसाठी काही  

-अमित श्री  . खरे