Friday 7 March 2014

माणूस शोधतो मी

माणूस शोधतो मी

 सपाट जमीन
उंच इमारत,
रस्त्याचे जाले 
वारा तुरलक.
घराच्या गच्चीत 
गुलाबाचे रोप
स्पर्टेक्स च्या फारशीला
वासाचा सोप.
खीडक्यांच्या  काचांना 
लाकदान्च्या चौकटी
जंगलातल्या प्राण्यांचे
जीवनच विस्कटी.
प्रत्येक डोंगरात
निघते खाण
समुद्रात नेवून 
टाकतात घाण.
होतात स्फोट
रोज इथे खून
हेच बघतो
रोज टिव्ही मधून.
रोज नवी सत्ता
रोज नवा नेता
थाम्बताही नाही
ह्यांच्या तोंडाचा भाता.
माणूसकी ही इथे
किलोवर मिळते 
किलोभर विकते
बाकी गोड़ावूनमध्ये पड़ते.
रोज रोज हे 
दगड़ होवून बघतो मी
रोज रोज नव्याने 
माणूस शोधतो मी. 

-अमित श्री. खरे 

No comments:

Post a Comment