पहिला पाऊस
पहिल्या पावसाची
पहिली आठवण
तप्त मातीच्या
गंधाची साठवण
पहिल्या धारांत
पहिले भिजणे
मळभ मनीचे
अलगद सरणे
पहिल्या थेम्बाचा
पहिला नाद
मृदुल स्वरांनी
द्यावी साद
पहिल्या तळ्यात
पहिली नाव
झऱ्या झऱ्यांतून
सफ़ेद गाव
पहिल्या नभांचे
फिरुन जाणे
चातक मनीचे
वाट पहाणे
पहिला पाऊस
सांगुनी जाई
भाजल्या भुई
मिलन घाई
-अमित श्री . खरे