Monday 20 January 2014

सल्ला

सल्ला

तुम्ही कुणाला चांगलं सांगायला जा 
ते  तुमच्यावरच पलटतील 
तुम्ही समजवायला जा त्यांना 
ते घात घात करूँ ओरडतील 

तुम्ही मदत करा कुणाला 
ते तेवढ्याच वेळासाठी प्रेमात पडतील 
तुम्ही त्यांना प्रश्न विचारा 
ते मूर्तिमंत कृतघ्न दाखवातील 

तुम्ही कुणासाठी वेळ काढा 
ते हमखास उशीर करतील 
तुम्ही हे बोला चुकून त्यांना 
ते तुम्हाला हजार खोटी कारणं देतील 

कही शिकायाचेच असेल तुम्हाला 
तर दुसर्याचा विचार करायचा विसरा 
आणि दूरसे कोण हे ठरवण्याआधी 
आपले कोण हे नक्की ठरवा 

ह्या आपल्या लोकांसाठी तुम्ही काहीही करू नका 
ते तुमच्या बरोबरच राहतील 
कितीही भीषण काळोख असला 
तरी ते तुमच्या बरोबरच असतील 

ह्याच कारण एकच आहे 
तुमच्यातल अतूट प्रेम
ह्यांना जपा जीवापाड 
होईल सगळं कुशल क्षेम 

-अमित श्री  . खरे 

लीला


लीला 

मृत्यूची चाहूल 
जन्मा आधी लागे 
काय ही रे किमया 
जन्मदात्या!

कोमेजुन जाई कळी
उमलनया आधी 
काय ही रे रया 
विश्वकर्म्या !

वाहूनिया पाणी जाई 
थोड़े पिण्या आधी 
काय ही रे चेष्टा 
अन्नदात्या!

दुःख आधी येते 
सुखाच्या ही आड़ 
काय ही उपेक्षा 
प्रेमदात्या ! 

शेवट होवुनी 
मातीत मिळवसी 
काय ही रे लीला 
जगत्रात्या !

Amit khare.

बहर

बहर 

मी बहरात असता 
बहरे सारे रान 
करते मग मज बेफाम 
ही ओढ़ कुण्या जन्माची 

बहरात डुम्बुनी काया 
येतसे ग्रीष्म नांदाया 
कुठे रुसून बसते छाया 
ही अल्लड वेळ नृत्याची 

नाचुनी हिंडती मोर 
करी गगनभेदी हिंडोर 
चातका लावी ही घोर 
जशी आस अशी वृष्टीची 

वृष्टीत कधी भिजताना 
भेभान होतसे राधा 
पाहुनी गर्द निळाई 
बहरात हरावुनी जाइ 

-अमित श्री  . खरे 

Saturday 4 January 2014

ह्याचं उत्तर तुम्हीच शोधा।

ह्याचं उत्तर तुम्हीच शोधा। 



खरतर हे कोडं नाही 
न सुटणार 
किंवा नाही हां अवघड प्रश्न 
दोन पाच मार्कांचा। 
दिसायला हे कोडं असेल 
गूढ़ अर्थ लपलेलं 
किंवा आतापर्यंत 
कुणालाच न सुचलेलं 
प्रश्न ही असेल कदाचित 
अखंड उत्तर असलेला 
ज्याच उत्तर 
कुणाकडेच नाही असा।  
ह्याच्यात आहेत 
अनेक भावना 
अनेक वेदना 
अनेक सुखं 
अनेक दुःख 
अनेक नाती 
अनेक माणसं 
अनेक आशा 
अनेक निराशा।  
ह्यात आहेत 
अनेक अनुभव 
काही भले 
काही बुरे 
हयात आहेत 
अनेक इशारे 
काही खोटे 
काही खरे।  
हयात तुम्ही कधी 
आपणहून जात नाही 
हयात तुम्ही अडकता 
जन्मलया बरोबर 
ह्यातून सुटका 
एकदाच 
जेव्हा होतो 
देह नश्वर।  
ह्याला घाबरून 
जाउ नका 
हे तुम्हाला 
खाणार नाही 
ह्याला सुट्ट 
सोडू नाका 
हे परत 
येणार नाही।  
कोडं म्हणत असाल ह्याला 
तर सोडवायचा प्रयास करा 
प्रश्नच वाटला कढ़ी तुम्हाला 
उत्तराच्या मागे लागा।  
सुटेल किंवा सुटणार नाही 
उत्तर मिळेल किंवा मिळणार नाही 
शोधायचा प्रयत्न समजा केला 
जीवन नक्कीच कळून जाई।  

-अमित श्री  . खरे 

आनंद

आनंद


प्रत्येक अंधार एक नवीन दिवस घेवुन येतो,
तरिहि आपण रोज तेच तेच काम करतो.
सकाळि उट्तो,
ओफ़िसला जातो,
कामचे धिग मांड्तो,
आणि उशिरा घरि येतो.
घरि येवुन फ़्रेश होतो,
टि.व्हि बघत जेवण करतो,
रत्रि थोडि कोफ़ि पीतो,
आणि परत रत्रि झोपून जातो,
सकाळि लवकर उथण्यासाटि.
नेहमि प्रमाणे सकाळि लवकर उट्तो,
परत परत तेच तेच करतो,
वर्शानु वर्श,
शतकानु शतकं.
कधितरि मनात टरवतो,
कहि वेगळं करु,
त्या दिवशि खटाटोप करतो,
आणि दुसर्या दिवशि गप्प पडतो,
त्याच फ़ाइल बघत.
सर्व प्रयत्न करुन होतात,
दिवस अन दिवस व्यर्थ जातात,
युगं सरल्या सारखी वर्श सरतात,
तेच तेच सुर्य फ़िरत रहातात.
कधितरि अचानक 
रोज भेटणारा मित्र फ़ोन करतो,
संध्याकाळि कोफ़ि प्यायला
नक्यावरच्या टपरिवर बोलावतो,
आपण वेळेवर तिथे जातो
पण त्याला यायला उशीर होतो,
आपल्याला ओफ़िसचि सवय असते
मित्र घरिच बसुन असतो काम नसल्याने
गेलि अनेक दशकं.
त्याला काहि हजार मिळालेले असतात
एल.आय.सि.च्या पोलिसि मधुन,
त्यचिच हि पार्टि असते 
टपरिवरच्या कोफ़ितून.
त्याला मिळालेलि रक्कम
आपल्या पगारा एवधि असते,
आणि त्याला मिळालेल्या आनंदाचि रक्कम 
आपल्या सेविंग एवधि असते.
त्याचा आनंद बघुन आपण मात्र
खचित होतो,
कारण आजपर्यंत 
फ़क्त आपणच आपले जगत असतो
घरात सगळे असताना.
आपल्याला हि बाब कळते,
आपण त्यातुन पटकन शिकतो
आणि लगचच्याच पगाराचि घरच्यांनाहि 
पार्टि देतो त्या मित्रासकट,
त्याच नक्यावरच्या टपरिवर.

-अमित श्री  . खरे 

उम्मीद

उम्मीद   


जब ना हूँगा 
इस जहां मैं 
होगे मेरे 
लब्ज तो लेकिन 
जब जाऊँगा 
छोडके दुनिया 
ना रेह पावूं 
वहाँ पे तुम बिन।  
उन्ही लब्ज को 
पास ही रखना 
याद आने पर 
थोडा चखना 
फिर भी ना आवे 
चैन जो तुमको 
हमसे तब 
शिकवे ना रखना।  
लौट के आऊं 
तुमसे मिलने 
छोड़ी से ये 
राह भी तकना 
जब भी आऊं 
जहां भी आऊं 
मुझको आपने 
पासही रखना।
वादा मेरा 
फिर आने का 
उम्मीद हमेशा 
कायम रखना। 

-अमित श्री  . खरे 

अहम

अहम 



प्रत्येकजण आता इथे 
जगतो फ़क्त स्वत:साठी 
दुसर्याचा आता इथे 
विचारसुधा होत नाही। 

दुसर्यासाठी आश्रु सोडाच 
पण आनंदही होत नाही 
दुसर्याची साथ दूर राहिली 
मदतीला हातही येत नाही। 

केलेले वादे इथे 
हर मिनिटात तुटतात 
आणि शपथा तर इथे 
वजनावर विकतात।  

इथे आता कुणाला 
कुणाचीच गरज नाही 
गरजेला यन्त्रच सारी
माणूस तेव्हा दूरच राही।    

आता इथे माणूस असणं 
हेच आहे मोठं पाप 
कारण इथे संचारतो 
अहम चा विषारी साप. 

हाच साप जेव्हा ह्यांना 
राक्षस होवून खायील 
माणूसच तेव्हा ह्यांचा 
मदतीला येईल।  

-अमित श्री  . खरे 

गाढ़ झोप

गाढ़ झोप 



किती ओरडणार घसे फोडून 
ते तर कधीचेच बहिरे झालेत 
कर्ण्याचा आवाज कितीही मोठा करा 
त्यांची झोपमोड सुधा होत नाही आता 

त्यांना कधीही गाढ़ झोप लागते 
सकाळी दुपारी अथवा रात्री 
कारण त्यांची बांधलेलं 
चिरेबंदी अजस्त्र कुंपण 

ह्या कुम्पणाला दोनच बाजूने दार आहेत 
त्या प्रत्येक दारावर 
दहा बारा रक्षक आहेत 
ते आता सवायिनं मालकालाही तपासतात 

ह्या दारातून तुम्हा आम्हाला 
पलीकडचन काहीच दिसत नाही 
तुमच आमच इथे सोडाच 
वाराही ह्याचं घुसत नाही 

ह्यांना तेव्हाच जाग येते 
जेव्हा आपल्या बोटांवर शाई लागते 
तेव्हा मात्र ह्यांना ऐकू येतं इतक 
तुम्ही न मागितलेलंही देतात हे तुम्हाला 

थाम्बा सावध व्हा जागे व्हा  
हे ऐकू येणं थोड्या काळच आहे 
शाई बोटावरून जाण्याआधी
घोरणं ह्यांच चालू होणारे 

ह्यावर उपाय एकच 
ह्यांना झोपू देवू नका 
आता हे परत झोपले 
टार पुन्हा कधीच उठणार नाहीत 

-अमित श्री  . खरे 

माणसाचा शोध

माणसाचा शोध 



पुरे झाले 
फूल पक्षी 
आता माणसासाठी लिहू 
थोड़े सुखाचे 
थोड़े दुःखाचे 
ज़रा माणसाकडे पाहू। 
किती वर्ष उगवणार 
तेच तेच सूर्य तारे ?
किती वेळा बदलणार 
तेच ऋतु ६ बिचारे ?
किती वेळा चातकाला 
पावसाची वाट बघत बसवणार? 
किटी वेळा सुन्दर चाफयाला 
गालामधे खुदकन हसवणार ?
त्याच त्याच नद्या 
आता वाहून वाहून कोरड्या झाल्या 
त्याच समुद्राला तिथेच मिळताना 
जाणून बुजून विसरुन गेल्या।
माणूसच का आता 
आपल्याला दिसत नाही?
दिसला जर तर फ़क्त प्रेमात 
बाकी कुठेच मिळत नाही।  
माणसांचे प्रश्न आता 
इतके का क्षुल्लक झाले ? 
माणसांच्या भावनांचे 
गल्लोगल्ली फलक झाले ? 
माणूस कसा हरवून गेला 
डॉन ओळी मधल्या यमकात?
माणूस मागे पडत गेला 
चालींच्या सुन्दर गमकात।  
आता त्या पुन्हा एकदा 
थोड़े थोड़े आठवायला हवे
पुन्ह्या कविता गाण्यातून 
माणसाला शोधायला हवे।  

-अमित श्री  . खरे 

खेळणी आणि वाद्य

खेळणी आणि वाद्य 



आता ह्या खेळण्यांशी 
कुणीच खेलत नाहीत 
ही अशीच पडूं आहेत धुळीत 
दशकानू दशक 

ही वाद्य ही आता 
कुणीच वाजवत नाही 
फाडक्यांमधे गुंडाळून 
अडगळीत पडली आहेत 

ह्या खेळण्यांची किम्मत 
तेव्हा आम्हाला कोटींमधे होती 
आता त्यावर तेवढ्याचीच 
जलमत जमाली आहेत 

वाद्यांचा उपयोग होतो कधी 
जेव्हा ती देखावयासाठी नेतात 
तिथे बघण्यासाठी त्यांना केवढी तरी गर्दी होते 
घरात मलाही कधी वेळ होत नाही बघायचा 

ती खेळणी आणि वाद्य 
आज मुद्दाम काढली माळ्यावरून 
थोड़ा आठवणीत रमुया 
असा साधा विचार करून 

उपयोगक काही झाला नाही 
खुप पुढे निघून आलोय आता 
कदाचित आता माझ्या आठवणींवर 
तेवढीच धुल साचली असेल 
ती ही साफ़ करायची गरज भासेल 

पण ती काही केल्या साफ़ होत नाही 
कारण आता वेळ नाही त्या आठवणीत जायला 
कदाचित त्यासाठी परत मूल व्हाव लागेल 
आणि त्याही आधी ते मूल मला शोधाव लागेल 

ते इथेच लपले कुठेतरी 
किंवा बदलले त्यानी रूप 
पण आता शोधण गरजेचं आहे 
कारण त्या आठवणीत परत जायचय 
त्या खेळण्यांशी, वाद्यांशी नव्याने मैत्री करायला 
कारण आता परत टी हरवली 
तर उत्खनन करून शोधावी लागतील 
काही शतकांनंतर  

-अमित श्री  . खरे 

एक

एक 


विचार तुझ्या मनाला 
किंवा हवं असल्यास माझ्या 
दोन्ही तुला हेच सांगतील 
'आपल मन एक आहे ' 

हसतो खेळतो 
रडतो भांडतो 
आपल्यातल नातं 
नेक आहे 

कधी कधी आपण उगाचच 
रुसतो अणि भांडतो 
दोघातला राग 
अगड़ी फेक आहे 

आयुष्या कड़े बघायचा 
दोघांचा दृष्टिकोन 
अगड़ी वेगळा
पण टेक अगड़ी आहे 

दोघ एकमेकांना 
सस्तेमैं काढत असू मजेत 
पैन मानतलं एकमेकांच्या स्थान 
अन अमौंटेड चेक आहे 

कितीही वेगळे असू आपण 
आणि राहत असू दूर 
वेगळ असून शरीर आपल 
मन मात्र एक आहे 

-अमित श्री  . खरे 

पल

पल 

यार आज बिछड़े 
पल तोह मिला दे 
गम ही सही 
दो पल तोह मिला दे 

यार आज मेरा 
तू ही भरोसा 
तू ही हमेशा 
था मेरा साया 
एक पल मैं खुद को 
खुद से मिला दे 

तेरा ये वादा 
जिसमे कहा था 
तुझसे आकर 
जब मैं मिला था 
तुझसे ही हैरत 
तुझसे ही शिकवे 
मिल जा कभी तो 
गले तोह लगा ले 

उन पल मैं जी लूं 
उन पल पे मरलूं 
उन पल कि सदा 
फितरत मैं कर लू 
वोह पल की राहें 
देखे जिया हूँ 
वोह पल को देखूं 
तो मौत से भी मिललूं 

-अमित श्री  . खरे 

रागरंग

रागरंग 



अचानक धावून येतोस 
वसन्तातल्या तानांतून 
अन क्षणात घेवून जातोस 
मारव्यापारी हलकेच दूर।  
देस प्रमाणे तुझ असण 
अगदी उपजत वाटतं 
बोलणं मात्र श्री प्रमाणे 
स्थितप्रद्न्याच बोलणं वाटतं।  
मालकंसी शब्दांतून कधी  
अगदी मधुर वाटतोस 
तर अचानक  कौसी च्या 
द्रुततला तराणा होतास।  
तुझ वहात जाण
जौनपुरी सारख मनोहारी भासत 
तुझं शांत असणं 
पुरियासारख सुसंगत असत।  
तुझ्या साध्या शबदातूनही 
भक्तिमय भैरवी ऐकू येते 
अन तुझ्या मिलनाच्या कथा 
सहज बागेश्री सांगून जाते।  
असाच कायम आमच्यात 
भैरवासारखा घुमत रहा 
भिन्न षड्ज होवून सुधा 
सगळ्यांकडे सामान पहा।  

-अमित श्री  . खरे  

सदा के लिए

सदा के लिए 



आज फिर मेहसूस हुवा 
मेरे साथ हो तुम 
सदा के लिए 
ना होगा दवा का असर 
तेरी दुवा तोह होगी 
सदा के लिए।  
ये जो एहसास है 
वोही जीने की वजहा है 
सदा के लिए 
ना छोड़ेंगे साथ 
हाथो मैं है हाथ 
सदा के लिए।  
तुमसे बात करता हूँ तो लगता है 
जैसे ये बात होती है 
सदा के लिए 
बिछड़ भी जाता हूँ तुमसे तोह लगता है 
ये दूरी ना होगी 
सदा के लिए।  
ये बातें तुम्हारी मेरी 
ये ना बदलेगी 
सदा के लिए 
ये वादा साथ चलने का 
साथ ही रहेगा 
सदा के लिए।  

-अमित श्री  . खरे 

मौन

मौन 



मौनात केवढा बोलून गेलो 
सुखाचं दुखाच गेलेल्या प्रत्येक क्षणाचं 
अचानक होवून शांततेचा आवाज 
अन हरवून शब्दांची आस।  

एवढा गोंगाट झाला तेव्हा 
एक आवाजाही न होता 
केवढा प्रचंड मोठा निशाब्द 
आघात झालेला जेव्हा।  

तेव्हाच जागा झालो होतो 
अविश्रांत अथक गुंगीतून 
एकटाच तेव्हा फिरत होतो 
गर्दीच्या निर्मनुष्य वस्तीतून। 

हरवलेल काहीसा
अस्पष्ट दिसल्यावर 
थक्का झालो अचानक 
त्याच जागी पोचल्यावर।  

आनंद एवढा 
शब्दात बांधू न शकल्यावर 
उतरूं आलो अचानक 
सात स्वर्ग मौनावर।  

मौनात बोललेल ऐकायला 
सोबतीला एक कान होता 
पुढे पुढे चालताना 
आधाराला हाट होता।  

तोच कान पुन्हा एकदा 
दशकांनंतर अवचित भेटला 
निश्चिन्त होवून मी ही तेव्हा 
मौनाचाच आधार घेतला।  

-अमित श्री  . खरे 

राह

राह 


ये दुःख सहा ना जाए 

तोसे कहा ना जाए 

दर्शन को तरसी है आँखे 

साजन, अब तो आजावे 



बरसोंसे बरसा जाए सावन 

फिर भी आग दिल की न बुझ पावे 

आदत है येतो राह तकती 

मुझको बिरहन बानाये।  



अरज मोरी काहे नाही सुने 

पीया बिन बाग़ भी बंजर रे 

तोसे देखाने का मन ये चाहे 

बोल तू कासे ना आवे? 


-अमित श्री  . खरे 

चक्र

चक्र 


मन आभाळ आभाळ 

मुक्त पाखरांचे घर 

त्यात कधी येती जाती 

ढग पावसाळी चार।  

मन पावसात भीजे 

चिंब ओले ओले होई 

मग तृप्तित जळाच्या 

नदी होवुनिया जाई। 

मन वहाता वाहता 

मागे वालोनी मग पाही 

वाट डोंगर दरयांची 

त्यास वाटेनाच काही।  

मन  तहाने व्याकुळे 

सर्वां जीवन देवुनी 

त्याचे त्यास ना उमजे 

स्वत: नदी ही होवुनी।  

चार कोस ओलांडोनि 

मिळे सागरास कोठे 

त्याचे तयात कळे ना 

चक्र आयुष्याचे दीठे।  

भूतकाळ आठवता 

त्यास पड़ते हे कोड़े 

मग तापोनि तापोनि 

पुन्हा आभाळास भिड़े।  

-अमित श्री  . खरे 

मूर्ती

मूर्ती 


असीम प्रेमे तुझिया झालो 


कधी कानडा कधी वैरागी 

तुझिया नावे दानूनी सारे 

सहस्रकांचा निर्गुण त्यागी। 

तुझिया प्रेमे अर्पियले मी 

युगा युगांचे माझे मीपण 

स्वैर खुशीने अर्घीयले मी 

होते नव्हते माझे मन-धन। 

तुझिया पाशी घेवून आली 

ओढ़ मनाची दिशा दिशांतून 

तुझिया चरणी विरून गेली 

सुप्त वासना सुगंध होवून। 

तुझीच मूर्ती बनवीत असता 

कधी न दमलो अथवा थकलो 

बनवूनी मूर्ती अमूर्ततेची 

नंतर मजला शोधित बसलो।  


-अमित श्री  . खरे