Wednesday 5 March 2014

प्रतिबिम्ब

प्रतिबिम्ब 

पुरे झाले तुझे 
असे शांत बसणे 
अपमानही तू 
सहज पोटी घेतो 
पुरे झाले आता 
तुझे फ़क्त हसणे 
दुःख अपार कधीचे 
सहजच लपवतो 

बोल जरासा 
अबोला सोडून 
सागर मनीचा 
वाहून जावो 
किंवा लाभो थोड़ा 
ओलावा मायेचा 
दुःख तयाने 
उडून जावो 

तू लपवीत असशील 
यातना मनी 
तुज नयनी त्या 
सहज वाचतो 
तू सहज हसता 
नकळत गाली 
आनंदे त्या मी 
स्वैर नाचतो 

बघू न शकतो 
नयनी आसू 
ते माझ्यावर 
ओझे होते 
बघण्या रेषा 
हास्याची गाली 
मनही पागल 
होवून जाते 

म्हणून सांगतो 
सांग मजला 
दुःख  तुला जे 
नकळत छळते
तू हसत असता 
जना मनातून 
यातना तुझी 
सहजच कळते 

ही नाळ असेल 
मायेची बहुधा 
तुजला मजला 
जोडून जाते 
अथवा असेल 
मनी जिव्हाळा 
तुजला मजला 
प्रतिबिम्ब करते 

-अमित श्री  . खरे  

No comments:

Post a Comment