Saturday, 15 February 2014

तुजपाशी

तुजपाशी 

तुज तुजपाशी असो सारे 
तू माझ्यापाशी रहा 
तू असताना कसली चिंता 
तू जग माझ्यातून पहा 

तुझे नि माझे नाते निराळे 
हे कधी कुणा न समजे 
मजला पड़ती प्रश्न हजारो 
तुज त्याचेही उत्तर उमजे 

माझे मीपण कधी दडून बसते 
बेचैन तुझ्या जीवास लागे 
त्या शोधाया तत्परतेने 
तुझे मन दसदिशात धावे 

शोधून आणि शीताफिने 
त्या प्रेमाने मग कुरवालते 
चुक तयाचि घालून पोटी 
पप्रेमानेच समजावते 

तू असताना म्हणून मी ही 
निर्धास्तपणे स्वैर धावतो 
चुकत असलो वाट कधी तर 
नजरेनेच मार्गी येतो 

Thursday, 13 February 2014

शून्य दिवस 

शून्य दिवस 

आज घरा घरावर दिसतील 
तिरंगे फडकलेले 
आज चौका चौकात ऐकू येतील 
देशाभाक्तिची गीते 
आज सगलेच गातील 
ओरडून ओरडून राष्ट्रगीते 
आज सगलेच म्हणतील 
'तूच देवी भारतमाते'
आज सगलेच सकाली लवकर उठतील 
ध्वजारोहण करायला 
दिल्ली पासून गल्ली पर्यन्त 
अशास्वत अवास्तव भाषण ठोकायला 
आज सगाल्यान्च्याच मणी जागा होईल 
ज्वलंत राष्ट्राभिमान 
अन प्रत्येकाजन तैयार होईल 
सीमारेषेवर जायला आज . 
उद्या लागेल ह्यांना 
हालवून जागं करायला 
अन मागे लागावं लागेल 
आवरून ह्यांना कामावर पाठवायला . 
उद्या सकाळी दिसतील 
रस्त्यावर पडलेले असंख्य तिरंगे 
उद्या सकाळी दिसतील 
गरीब, भिकारी, उघडे नंगे . 
उद्या संध्याकाळी विचारा ह्यांना 
ह्यांचे मनोरे रचलेले असतील 
रात्री भेटलात समजा अवचित 
तेच मनोरे झुलताना दिसतील . 
आज ह्यांना आनंद आहे उत्साह आहे 
निमित्त त्याच सुट्टी आहे ,
आज समजा सुट्टी नसती तर 
दिवसाच महत्त्व शून्य आहे . 

-अमित श्री . खरे

दोष

दोष 

रात्रभर जागून तारे मोजले मी
पण तरी बरेच राहून गेले आहेत,
मोजता मोजता कधी पूर्णविराम उजालला
समजलच नाही.
रात्री दिसत होते 
तार्यांचे अनेक समूह
आणि हसत होते माझ्याकडे बघून
जसा काही मी विदूषक असावा.
पण ह्यातला कुठलाच तारा
आपलासा वाटत नाही
लांब बसलेला असा अता
कुणी लक्षही वैधत नाही.
पांढरे, लाल, पिवाले, हिरवे
लुकलुकनारे न लुकलुकाते
एकते एकते
समूहात दडलेले.
भरून टाकतात आभाळ
एक एक ठिपका बनून
कुणी कधी लपून जातात
आकाशात प्रकाश भरून.
ह्या तार्यांची सवय
अगदीच काही वाईट नाही
वेळ जाण्यापेक्षा
ओळख कधीच पुसत नाही.
हल्ली तर 
एक प्रश्नच उभा राहीला आहे
कारण हल्ली 
तारी मोजणाच होत नाही. 
तारी मोजण दूर राहीला
हल्ली गच्चीवर जाताच येत नाही
कारण दोष जीन्याचा
सध्या
गच्चीचा जीना
फक्त खाली उतरतो.

-अमित श्री. खरे 

माणूस होता आल पाहीजे 

माणूस होता आल पाहीजे 

पावसासारखा होता यायला पाहीजे 
सगाल्यान्ना सारखा देता यायला पाहीजे
सगालीकडे चैतन्य भरता आला पाहीजे
आणि शिंपडून ज़ल्यावर थोडा उनही द्यायला पाहीजे.

नदी सारखा होता यायला पाहीजे
वाहाताना किनारे राखून वाहता आल पाहीजे
कधी उन्हात सुकता यायला पाहीजे 
आणि डोह बनूँ साठता यायला पाहीजे.

झाड़ान्सारखा होता यायला पाहीजे
शीतल स्वागती सावली देता यायला पाहीजे
जगताना दुसर्याला घर देता यायला पाहीजे
आणि मेल्यावर कोलसा होता आल पाहीजे 

सगळ्यात शेवटी माणूस होता आल पाहीजे 
दुसर्यावर निर्व्याही प्रेम करता आल पाहीजे
दुसर्याच दुःख वाटून देता आल पाहीजे
आणि शेवटी जाऊं माणूस म्हणून जागता यायला पाहीजे.

-अमित श्री. खरे 

सावल्या

सावल्या 

मला सावल्यांचा
खेलच कळत नाही.
कुठुनाही येतात
कुठेही जातात
कशाही वागतात
कशाशाच दिसतात.
कधी येतात 
देवदूत बनूँ
कधी येतात 
दानव बनूँ
कधी येतात
मदत बनूँ
कधी येतात
संकट म्हणून.
सावल्या माणसांच्या
सावल्या प्राण्यांच्या
सावल्या झाडांच्या
खोल समुद्राच्या.
सावल्या ओलखिच्या
ओळख न देणार्या
सावल्या स्वतहाच्या
खेचून खेचून नेणारया.
सावल्या गडद 
सावल्या रुपेरी
सावल्या भीषण
सावल्या सोनेरी.
रंगांच्या सावल्या
गंधांच्या सावल्या
रुपाच्या सावल्या
भूताच्या सावल्या.
सावल्या अंगावर येतात आता
वाखवाखता प्रकाश बनून
ओढून नेतात देहा
भलत्याच क्लुप्त्या करून.
म्हणून हल्ली 
सावल्यांना टालत फोरतो 
अन मधेच 
स्वतहाच्या सावालेला भीतो.
सावाल्यान्पासून वाचान्यसाथी
एक युक्ती शोधली आहे
ह्यांच्या खेलापसून लपून
सावलीच होवून फिरतो आहे.

-अमित श्री. खरे 

Wednesday, 12 February 2014

अजब प्रेम

अजब प्रेम 

प्रेमापोटीच असेल बहुधा
पृथ्वी फिरते सूर्याभोवती
मायेनेच तिच्या त्या बहुधा
सूर्य चमकतो सदा आकाशी.

सूर्याचे नाते असे हे
प्रुथ्विने जे धरून ठेवले
अहंकार न करता कोणी
फिरत राहीले जळत राहीले.

रुसन्यासाथी असे कदाचित
दोघंसाठी कधी ग्रहण ते
बघता सुटल्या नंतर दोघा
कितिक येतसे गहिवरून ते.

अगणित वर्षे होवून गेली
सूर्य कधी ना शीतल होई
प्रेमाने ह्या परस्परांच्या 
पृथ्वी सुधा घिरट्या घेई.

-अमित श्री. खरे 

हां रस्ता असाच पुढे जातो.

हां रस्ता असाच पुढे जातो.

तुटलेली देवले
फुटलेल्या मशीदी
दुतार्फा जलालेला तस्कट
अन भेगाललेली माती तुडवत.
ह्या रस्त्यावर उरले आहेत आता
चिरेबंदी वाडयांचे भग्नावशेष 
फुटलेली वेस अन
अपूरया वासनांचे क्लेष.
रस्त्यावरून जाताना येतो
ओल्या रक्ताचा ओला वास
अन जागो जगी दिसत रहाते
मोडलेल्या माणसांची उंच रास.
रस्त्यावर आता 
गिधाडाही घेरावत नाहीत,
कोल्ह्याची टोली दूरच
कुत्री सुधा ओरडत नाहीत.
ह्या रस्त्यावर कोण्या एकेकाली
नांदत होती सुवर्ण नगरी
आगागाडीचे रूळ रुपेरी,
रस्ते होते चार पदरी.
नगरी मधे नांदत होते
मानुसकीचे अमोल नाते
अन दुखान्शी भांडत होते
लाहान मोठे मिळून सारे.
आला कोठून तूफ़ान वारा
घेवून पाउस सवेत गारा
केला मारा अथक तयाने
वाहून गेला गावाच सारा.
रातोराती गायब झाले
चिरेबंदी दगडी वाडे,
वाहून नेले सेव तयाने
उंच पालने पांगुलागाड़े.
उरला मागे चिखलच सारा
काढिता थकला गावच सारा
गलूँ पडले प्रयत्न त्यांचे
भग्न मनोरथ उरला सारा.
निघून गेले मग ते सारे
जे जे वाचले महापूरातून
कधी न आले परतून कोणी
दूर दूरच्या त्या शहरांतून.
पडल्या झाडल्या ह्या गावातून
आता कोणी पथिक न येतो
तुटलेल्या अथावानी घेवून
हां रस्ता असाच पुढे जातो.

-अमित श्री. खरे