Thursday 13 February 2014

शून्य दिवस 

शून्य दिवस 

आज घरा घरावर दिसतील 
तिरंगे फडकलेले 
आज चौका चौकात ऐकू येतील 
देशाभाक्तिची गीते 
आज सगलेच गातील 
ओरडून ओरडून राष्ट्रगीते 
आज सगलेच म्हणतील 
'तूच देवी भारतमाते'
आज सगलेच सकाली लवकर उठतील 
ध्वजारोहण करायला 
दिल्ली पासून गल्ली पर्यन्त 
अशास्वत अवास्तव भाषण ठोकायला 
आज सगाल्यान्च्याच मणी जागा होईल 
ज्वलंत राष्ट्राभिमान 
अन प्रत्येकाजन तैयार होईल 
सीमारेषेवर जायला आज . 
उद्या लागेल ह्यांना 
हालवून जागं करायला 
अन मागे लागावं लागेल 
आवरून ह्यांना कामावर पाठवायला . 
उद्या सकाळी दिसतील 
रस्त्यावर पडलेले असंख्य तिरंगे 
उद्या सकाळी दिसतील 
गरीब, भिकारी, उघडे नंगे . 
उद्या संध्याकाळी विचारा ह्यांना 
ह्यांचे मनोरे रचलेले असतील 
रात्री भेटलात समजा अवचित 
तेच मनोरे झुलताना दिसतील . 
आज ह्यांना आनंद आहे उत्साह आहे 
निमित्त त्याच सुट्टी आहे ,
आज समजा सुट्टी नसती तर 
दिवसाच महत्त्व शून्य आहे . 

-अमित श्री . खरे

No comments:

Post a Comment