Friday, 7 March 2014

माणूस शोधतो मी

माणूस शोधतो मी

 सपाट जमीन
उंच इमारत,
रस्त्याचे जाले 
वारा तुरलक.
घराच्या गच्चीत 
गुलाबाचे रोप
स्पर्टेक्स च्या फारशीला
वासाचा सोप.
खीडक्यांच्या  काचांना 
लाकदान्च्या चौकटी
जंगलातल्या प्राण्यांचे
जीवनच विस्कटी.
प्रत्येक डोंगरात
निघते खाण
समुद्रात नेवून 
टाकतात घाण.
होतात स्फोट
रोज इथे खून
हेच बघतो
रोज टिव्ही मधून.
रोज नवी सत्ता
रोज नवा नेता
थाम्बताही नाही
ह्यांच्या तोंडाचा भाता.
माणूसकी ही इथे
किलोवर मिळते 
किलोभर विकते
बाकी गोड़ावूनमध्ये पड़ते.
रोज रोज हे 
दगड़ होवून बघतो मी
रोज रोज नव्याने 
माणूस शोधतो मी. 

-अमित श्री. खरे 

Wednesday, 5 March 2014

जत्रेच्या दिवशी

जत्रेच्या दिवशी

अरे बाप रे केवढी ही जत्रा,
वीतेवरून उतरताना विठू म्हणाला.
प्रचंड मोठी रांग,
हज़ारो कलपाम्च्या झुंडी,
प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा,
तरी सगलेच मारता आहेत मुसंडी!
चन्द्री तर दिसेनाशीच झाली,
आणि रुक्मिनीही रुसून गेली,
आज अठरा युग झाली,
तरी जात्रा संपत नाही,
येतात, राहतात, खातात, पीतात,
पण साफ कुणीच होत नाहीत.
मी मात्र असा वीटेवर थकलो,
पण माणूस कसा थकत नाही,
अव्याहत मागत राहतो फ़क्त,
कष्ट मात्र करत नाही.
काय सांगू, कसं सांगू,
काही-काही कळत नाही,
शेवाटीही सगळ इथेच साचत,
काहीच टाकता येत नाही!
म्हणालो , "बाबांनो येवू नका,
आषाढी कार्तिकी करू नका,
ते करून काहीच होत नाही, आणि केला नाहीत,
तर मी काही पलून जात नाही!"
नंतर चूक लक्षात आल्यावर,
मीच म्हणालो येत जा,
नाहीतर आषाढी कार्तीकीसोदूनही,
कधीतरी दर्शन देत जा!
दोन महीने सोडले,
तर कुणी कुणी येत नाही,
मागण्या पूर्ण झाल्या,
की ओळख सुधा देत नाही.
परत एकदा वीटेवर चढून,
आणि कमरेवर हात ठेवून,
जेव्हा तो पहातो,
तेव्हा परत सज्जा होतो,
अठरा युगांचा 
कंटाला झेलायला.

- अमित श्री. खरे 

प्रतिबिम्ब

प्रतिबिम्ब 

पुरे झाले तुझे 
असे शांत बसणे 
अपमानही तू 
सहज पोटी घेतो 
पुरे झाले आता 
तुझे फ़क्त हसणे 
दुःख अपार कधीचे 
सहजच लपवतो 

बोल जरासा 
अबोला सोडून 
सागर मनीचा 
वाहून जावो 
किंवा लाभो थोड़ा 
ओलावा मायेचा 
दुःख तयाने 
उडून जावो 

तू लपवीत असशील 
यातना मनी 
तुज नयनी त्या 
सहज वाचतो 
तू सहज हसता 
नकळत गाली 
आनंदे त्या मी 
स्वैर नाचतो 

बघू न शकतो 
नयनी आसू 
ते माझ्यावर 
ओझे होते 
बघण्या रेषा 
हास्याची गाली 
मनही पागल 
होवून जाते 

म्हणून सांगतो 
सांग मजला 
दुःख  तुला जे 
नकळत छळते
तू हसत असता 
जना मनातून 
यातना तुझी 
सहजच कळते 

ही नाळ असेल 
मायेची बहुधा 
तुजला मजला 
जोडून जाते 
अथवा असेल 
मनी जिव्हाळा 
तुजला मजला 
प्रतिबिम्ब करते 

-अमित श्री  . खरे  

Saturday, 15 February 2014

तुजपाशी

तुजपाशी 

तुज तुजपाशी असो सारे 
तू माझ्यापाशी रहा 
तू असताना कसली चिंता 
तू जग माझ्यातून पहा 

तुझे नि माझे नाते निराळे 
हे कधी कुणा न समजे 
मजला पड़ती प्रश्न हजारो 
तुज त्याचेही उत्तर उमजे 

माझे मीपण कधी दडून बसते 
बेचैन तुझ्या जीवास लागे 
त्या शोधाया तत्परतेने 
तुझे मन दसदिशात धावे 

शोधून आणि शीताफिने 
त्या प्रेमाने मग कुरवालते 
चुक तयाचि घालून पोटी 
पप्रेमानेच समजावते 

तू असताना म्हणून मी ही 
निर्धास्तपणे स्वैर धावतो 
चुकत असलो वाट कधी तर 
नजरेनेच मार्गी येतो 

Thursday, 13 February 2014

शून्य दिवस 

शून्य दिवस 

आज घरा घरावर दिसतील 
तिरंगे फडकलेले 
आज चौका चौकात ऐकू येतील 
देशाभाक्तिची गीते 
आज सगलेच गातील 
ओरडून ओरडून राष्ट्रगीते 
आज सगलेच म्हणतील 
'तूच देवी भारतमाते'
आज सगलेच सकाली लवकर उठतील 
ध्वजारोहण करायला 
दिल्ली पासून गल्ली पर्यन्त 
अशास्वत अवास्तव भाषण ठोकायला 
आज सगाल्यान्च्याच मणी जागा होईल 
ज्वलंत राष्ट्राभिमान 
अन प्रत्येकाजन तैयार होईल 
सीमारेषेवर जायला आज . 
उद्या लागेल ह्यांना 
हालवून जागं करायला 
अन मागे लागावं लागेल 
आवरून ह्यांना कामावर पाठवायला . 
उद्या सकाळी दिसतील 
रस्त्यावर पडलेले असंख्य तिरंगे 
उद्या सकाळी दिसतील 
गरीब, भिकारी, उघडे नंगे . 
उद्या संध्याकाळी विचारा ह्यांना 
ह्यांचे मनोरे रचलेले असतील 
रात्री भेटलात समजा अवचित 
तेच मनोरे झुलताना दिसतील . 
आज ह्यांना आनंद आहे उत्साह आहे 
निमित्त त्याच सुट्टी आहे ,
आज समजा सुट्टी नसती तर 
दिवसाच महत्त्व शून्य आहे . 

-अमित श्री . खरे

दोष

दोष 

रात्रभर जागून तारे मोजले मी
पण तरी बरेच राहून गेले आहेत,
मोजता मोजता कधी पूर्णविराम उजालला
समजलच नाही.
रात्री दिसत होते 
तार्यांचे अनेक समूह
आणि हसत होते माझ्याकडे बघून
जसा काही मी विदूषक असावा.
पण ह्यातला कुठलाच तारा
आपलासा वाटत नाही
लांब बसलेला असा अता
कुणी लक्षही वैधत नाही.
पांढरे, लाल, पिवाले, हिरवे
लुकलुकनारे न लुकलुकाते
एकते एकते
समूहात दडलेले.
भरून टाकतात आभाळ
एक एक ठिपका बनून
कुणी कधी लपून जातात
आकाशात प्रकाश भरून.
ह्या तार्यांची सवय
अगदीच काही वाईट नाही
वेळ जाण्यापेक्षा
ओळख कधीच पुसत नाही.
हल्ली तर 
एक प्रश्नच उभा राहीला आहे
कारण हल्ली 
तारी मोजणाच होत नाही. 
तारी मोजण दूर राहीला
हल्ली गच्चीवर जाताच येत नाही
कारण दोष जीन्याचा
सध्या
गच्चीचा जीना
फक्त खाली उतरतो.

-अमित श्री. खरे 

माणूस होता आल पाहीजे 

माणूस होता आल पाहीजे 

पावसासारखा होता यायला पाहीजे 
सगाल्यान्ना सारखा देता यायला पाहीजे
सगालीकडे चैतन्य भरता आला पाहीजे
आणि शिंपडून ज़ल्यावर थोडा उनही द्यायला पाहीजे.

नदी सारखा होता यायला पाहीजे
वाहाताना किनारे राखून वाहता आल पाहीजे
कधी उन्हात सुकता यायला पाहीजे 
आणि डोह बनूँ साठता यायला पाहीजे.

झाड़ान्सारखा होता यायला पाहीजे
शीतल स्वागती सावली देता यायला पाहीजे
जगताना दुसर्याला घर देता यायला पाहीजे
आणि मेल्यावर कोलसा होता आल पाहीजे 

सगळ्यात शेवटी माणूस होता आल पाहीजे 
दुसर्यावर निर्व्याही प्रेम करता आल पाहीजे
दुसर्याच दुःख वाटून देता आल पाहीजे
आणि शेवटी जाऊं माणूस म्हणून जागता यायला पाहीजे.

-अमित श्री. खरे